पुस्तकाविषयी

डॉ. संजय पंडया आणि डॉ . ज्योत्स्ना झोपे यांचे लोकप्रिय पुस्तक "सुरक्षा किडणी ची" माहिती आता वेबसाईट च्या रुपात आपल्याला मिळेल .

किडणी फेल्योर ची संख्या खूपच वाढत आहे पण सामान्य जनतेला या रोगाविषयी काहीच माहिती नाही. जेव्हा किडणी खराब होते तेव्हा डायलिसिस आणि किडणी प्रत्यारोपण असे महागडे उपचार करावे लागतात. भारतासारख्या विकासप्रधान देशात १०% रुग्णच असे महागडे उपचार करू शकतात. यामुळे किडणीच्या रोगाला आळा घालण्यासाठी प्रारंभिक उपचार करणे हाच एकमेव पर्याय आहे. आजच्या काळात माणसाच्या गरजा लक्षात घेताना, प्रत्येक व्यक्तीने किडणीच्या आजारापासून मुक्त रहाणे गरजेचे आहे. त्यांना या रोगविषयी सावधान करण्यासाठी या पुस्तक आणि वेबसाईट या माध्यमातून माहिती देण्याचे उदिष्ट आहे.

झा पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात किडणीविषयीची प्राथमिक माहिती आहे. या भागात किडणीची रचना आणि कार्य, किडणी रोगाची लक्षणं आणि निदान , किडणी रोगविषयी असलेले गैरसमज, किडणीच्या रोगाचा उपचार या बाबत माहिती देण्यात आली आहे.

दुस-या भागात किडणी फेल्योर, क्रोनिक किडणी फेल्योर, डायलिसीस, किडणी प्रत्यारोपण, डायबिटीसया आजारांमुळे किडणी कशी खराब होते याची माहिती दिली आहे.

किडणी रुग्णांचा इलाज हा पथ्य पाळून कसा केला जातो याची माहिती दिली आहे. हे पुस्तक डॉक्टरांच्या सल्ले आणि उपचारांनी परिपूर्ण आहे तरीही वाचकाने आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार करावेत.

पुस्तक माहिती

"सुरक्षा किडणी ची"
प्रकाशन वर्ष : - 2011
लेखक :डॉ. ज्योत्स्ना झोपे
डॉ संजय पंड्या, व्यवस्थापकीय संचालक, DNB (नेफ्रॉलॉजी), नेफरोलॉजिस्ट


 

wikipedia
Indian Society of Nephrology
nkf
Kidney India
http://nefros.net
magyar nephrological tarsasag