Read Online in Marathi
Table of Content
विवरण
प्राथमिक माहिती
किडणी फेल्योर
किडणी चे इतर मुख्य आजार
मुलांमबिल किडणीची आजार
किडणी आणि आहार

लेखक परिचय

डॉ. ज्योत्स्ना झोपे सी.१००२,
चैतन्य टावरर्स,
अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी,
मुंबई- ४०००२५ . (भारत)

डॉ. ज्योत्स्ना झोपे यांनी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून जनरल हॉस्पिटल मधून सन १९८६ साली एम.डी.मेडिसिन हि पदव्युतर पदवी प्राप्त केली.

त्यानंतर त्यांनी १९८९ साली गुजरात मधील अहमदाबाद येथील किडणी इन्स्टीटयूटमधून, किडणी संबंधातील विषेश पदवी (सुपरस्पेशालिटी) प्राप्त केली.

सदर पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे आय के डी आर सी (IKDRC) या रुग्णालयात आपली सेवा दिली व त्या दरम्यान , त्या उमरत्या नवीन व केवळ किडणी रोगकारिता असलेल्या रुग्णालयात पहिल्या १०० किडणी प्रत्यारोपण यशस्वीपणे पार पाडण्यात डॉ. झोपे यांनी मोठा हातमार लावला.

भारतामध्ये किडणी रोगाबदलचे प्रगलम प्राप्त केल्या नंतर त्यांनी इंग्लंड येथिल किडणी "लीस्टर हॉस्पिटल" मध्ये काही काळ व्यतीत केला , जेथे त्यांना डायलिसिस संबंधात अत्याधुनिक तंत्रझ।नाबदलचे झ।न प्राप्त झाले.

सन १९९७ पासून त्या मुंबई महानगरात किडणी रोगातग्न म्हणून काम करत आहेत. दरम्यानच्या काही काळात त्यांनी बी.वाय.ऐन.ऐल.नायर या महानगर पालीकेच्या रुग्णालयात आपली सेवा दिली.

सध्या डॉ. ज्योत्स्ना झोपे "मुकता किडणी अॅन्ड डायलिसिस क्लिनिक" हि संस्था चालवत आहेत. ही संस्था मुंबई व ठाणे परिसरातील वेगवेगलया रुग्णालयात किडणी रोगाचे व डायलिसिसचे विभाग चालवीते.

त्याचे प्रमाणे त्या विविध निमसरकारी संस्थासी निगडीत असून, त्यांच्या मार्फन त्या अनेक प्रकारचे समाजकार्य करत आहेत. ज्यायोगे समाजात किडणीच्या रोगाबद्दल योग्य माहिती दिली जाते व त्यावरील उपाय योजना व प्रतिबंध यासाठी त्याचा समाजाला उपयोग होतो.

केवळ याच उदेशाने त्यांनी "सुरक्षा किडणीची " या पुस्तकाच्या लिखाणात सहभाग दिला. हे पुस्तक लिहिण्यामागे एकच हेतू असा आहे की, किडणी रोगाबदल्ची योग्य ए खरी माहिती जनमानसात पसरावी व या रोगसंबंधी असलेले गैरसमज दूर व्हावेत.

डॉ. संजय पंडयासमर्पण हॉस्पिटल,
भूतखाना चौक,
एस.टी.बस स्टेशन जवळ,
राजकोट - ३६०००२ गुजरात, भारत.

डॉ. संजय पंडया यांनी जामनगर येथील एम. पी.शाह मेडिकल कॉलेजमधून १९८६ साली एम.डी.मेडिसिन हि पदव्युतर पदवी प्राप्त केली.

त्यानंतर त्यांनी १९८९ साली अहमदाबाद येथील किडणी इन्स्टीटयूटमधून डॉ. एच.एल. त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली किडणी संबंधित सुपरस्पेशलिटी पदवी प्राप्त केली.

गुजरातमधील राजकोट येथे गेल्या १९ वर्षापासून किडणी रोग तज्ञ (नेफोलोर्जिस्ट) म्हणून ते कार्यरत आहेत. ते अत्यंत निष्णात नेफोलोर्जिस्ट म्हणून प्रसिद्ध असून समर्पित प्राध्यापक आणि सिद्दहस्त लेखक अशीही त्यांची ख्याती आहे.

किडणी रोगापासून बचाव आणि उपचार पद्धतीची परिपूर्ण माहिती लोकांपर्यत पोहोचावी, यासाठी त्यांनी त्यांच्या मातृभाषेत 'तमारी किडणी बचाओ' हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला जनसामान्यांनी तसेच किडणीरुग्णांनी चांगला प्रतिसाद देऊन डॉ. संजय पंडया यांचा जनजागृतीचा हेतु सफल केला. त्यापैकी अनेकांना या पुस्तकाचा आपल्याला चांगला लाभ झाल्याचे अभिप्राय दिले आहेत.

गुजराती भाषेतल्या आपल्या पुस्तकाचा लोकांना चांगला उपयोग होत असल्याचे लक्षात आल्यावर, भारत भर अनेक हिंदीभाषक प्रांतामधल्या लोकांसाठी त्यांनी २००८ साली या पुस्तकाचा 'सुरक्षा किडणी की' हा हिंदी अनुवाद प्रकाशित केला. या पुस्तकालाही विविध प्रांतामधून लोकांचा प्रतिसाद मिळत असून आतापर्यत पुस्तकाच्या सुमारे तेरा हजार प्रति वितरीत झाल्या आहेत. यामुळे प्रोत्साहित होऊन आता महाराष्ट्रीय बांधवांसाठी डॉ. संजय पंडया यांनी हे पुस्तक 'सुरक्षा किडणीची' या नावाने मराठी भाषेत उपलब्ध केले आहे.