Read Online in Marathi
Table of Content
विवरण
प्राथमिक माहिती
किडणी फेल्योर
किडणी चे इतर मुख्य आजार
मुलांमबिल किडणीची आजार
किडणी आणि आहार

१. परिचय

सुंदर, स्वच्छ आणि निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही? शरीराच्या बाह्य भागाची स्वच्छता आपल्या हातात असते, परंतु शरीराच्या आतली स्वच्छता सांभाळते ती आपली किडणी कींवा मूत्रपिंड. शरीरातील अनावश्यक तसेच विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकून शरीर स्वच्छ ठेवण्याचे महत्वपूर्ण काम किडणी करते !

किडणीचे आजार होणाऱ्या रोग्यांच्या संख्येत गेल्या काही वर्षापासून वाढ होत आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजार होणाऱ्या रोग्यांच्या वाढत्या संख्येमुळे किडणी निकामी होणे वा तिची कार्यक्षमता कमी होणाऱ्या रोग्यांच्या संख्यातही मोठी वाढ झाली आहे.

या पुस्तकाच्या माध्यमातून; प्रत्येक व्यक्तीला किडणीबाबत माहिती, सूचना आणि सल्ले समाजावून सांगण्याचा हरेक प्रकारे प्रयत्न करण्यात आला आहे. त्याबरोबरच किडणीच्या आजारांची लक्षणे, उपचार आणि त्यावर नियंत्रण मिळविण्याबाबत पूर्ण माहितीही देण्यात आली आहे.

या पुस्तकातल्या विविध प्रकरणांत साध्या आणि सोप्या भाषेत किडणीचे रोग टाळण्याचे उपाय, किडणी रोगांशी संबंधित गैरसमज दूर करणे आणि डायलेसिस, किडणी प्रत्यारोपण, अवयव दान केल्यानंतर होणारे प्रत्यारोपण, (केडेव्हर प्रत्यारोपण) आहार, पथ्य या विषयीच्या सर्व माहितीचे विस्तृत विवरण दिले आहे.

वाचकांना कोणत्याही त्रासाशिवाय हे पुस्तक वाचता यावे, या साठी पुस्तकाच्या शेवटी मेडिकल शब्दावली आणि संक्षिप्त शब्दांचा सोपा अर्थ दिला आहे. सर्वसामान्य व्यक्ती आणि किडणी रोग्यांसाठी या पुस्तकातली माहिती अत्यंत उपयुक्त ठरेल. अशी आशा आहे.

किडणीविषयी जाणून ध्या आणि किडणीच्या रोगांना थांबवा