Read Online in marathi
Table of Content
विवरण
प्राथमिक माहिती
किडणी फेल्योर
किडणी चे इतर मुख्य आजार
मुलांमबिल किडणीची आजार
किडणी आणि आहार

७. किडणीच्या सुरक्षांचे उपाय

किडणीचे अनेक रोग खूप गंभीर असतात आणि त्यावर योग्य वेळी इलाजज केला नाही तर काहीच फायदा होत नाही. क्लॉनिक किडणी फेल्युअरसारख्या बऱ्या न होणाऱ्या आजाराच्या अंतिम टप्प्यातले, डायलिसिस आणि किडणी प्रत्यारोपणासारखे उपचार प्रचंड महाग असतात. ही सोय सगळ्या ठिकाणी उपलब्धही नसते. त्यामुळे “Prevention is better than cure” ह्या म्हणीचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. किडणी खराब होणे टाळण्याची माहिती प्रत्येक व्यक्तीला असणे गरजेचे आहे. याचे दोन भाग आहेत.

  • सामान्य व्यक्तींसाठी सूचना
  • किडणी रोग झाल्यास घ्यायची काळजी

सामान्य व्यक्तींसाठी सूचना

१. किडणी निरोगी राहण्यासाठी सर्वसाधारण सूचना:

  • रोज तीन लिटरहून अधिक (१० ते १२ ग्लास) पाणी प्यायले पाहिजे. (ज्यांच्या अंगावर सूज नाही अशा व्यक्तीनी)
  • नियमित व्यायाम करणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे.
  • ४० वर्षानंतर जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवणे.
  • धूम्रपान, तंबाखू, गुटखा आणि दारूचे सेवन न करणे.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उगाचच कोणतेही अनावश्यक औषध न घेणे.

२. कुटुंबात मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाचा आजार असल्यास महत्त्वाची माहिती:

मधुमेह आणि उच्चरक्‍तदाबाचा आजार हा अनुवंशिक असतो. जर हा आजार कुटुंबात असेल तर कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्‍तीने २० वर्षाचे झाल्यानंतर, हा रोग झालेला नाही ना? ह्याबाबत तपासणी करणे गरजेचे आहे.

३. नियमित आरोग्य तपासणी:

वयाच्या चाळिशीनंतर कोणताही त्रास होत नसला तरीही शारीरिक तपासणी केल्यास उच्च रक्‍तदाब, मधुमेह, तसेच किडणीचे अनेक आजार, लक्षणे दिसत नसतानाही निदर्शनास येवू शकतात. अशा रीतीने आधीच माहिती मिळाल्याने योग्य उपचारांनी भविष्यात किडणी खराब होणे टाळता येते.

किडणीचा रोग झाल्यास घ्यायची काळजी

१. किडणी रोगाची माहिती आणि प्राथमिक निदान:

चेहरा आणि पायांवर सूज येणे, तोंडाची चव जाणे, उलटी होणे किंवा उमाळे येणे, रक्‍त फिकट होणे, बराच काळ थकवा जाणवणे, रात्री अनेकदा लघवीला जावे लागणे, लघवी करताना त्रास होणे ही किडणी रोगाची लक्षणे असू शकतात.

असा त्रास होणाऱ्या व्यक्‍तींनी डॉक्टरांकडे जाऊन त्वरित तपासणी केली पाहिजे. वरील लक्षणे नसतांनाही जर लघवीतून प्रथिने जात असतील किंवा रक्‍तात क्रिएटिनिनचे प्रमाण वाढले असेल तर किडणी रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किडणी रोगाच्या प्राथमिक अवस्थेत झालेले निदान, रोगाला आळा घालण्यात आणि रोग बरा करण्यात महत्त्वपूर्ण असते.

२. मधुमेहाच्या रोग्यांसाठी घ्यायची महत्त्वाची काळजी:

डायलिसिस करून घेणाऱ्या, किडणीचा आजार असणाऱ्या प्रत्येक तीन रोग्यांपैकी प्रत्येकी एका रोग्यात किडणी खराब होण्याचे कारण मधुमेह असते.

ही गंभीर समस्या रोखण्यासाठी मधुमेह असलेल्या रोग्यांनी नेहमी औषधे आणि पथ्य पाळून मधुमेह नियंत्रणात ठेवला पाहिजे.

प्रत्येक रोग्याला, मधुमेहाचा किडणीवर होणारा परिणाम लवकर कळून यावा यासाठी, दर तीन महिन्यांनी रक्‍तदाब आणि लघवीतील प्रथिनांचे प्रमाण जाणून घेण्यासाठी तपास करणे आवश्यक आहे. रक्‍तदाब वाढणे, लघवीत प्रथिने असणे, शरीराला सूज येणे, रक्तात वारंवार साखरेचे (ग्लुकोज) प्रमाण कमी होणे तसेच मधुमेहासाठी घ्याव्या लागणाऱ्या इन्शुलिन इंजेक्शनची मात्रा कमी होणे ही मधुमेहामुळे किडणी खराब होण्याची लक्षणे आहेत.

जर रोग्याला मधुमेह असल्यामुळे डोळ्यांच्या तक्रारीवर लेसरचा उपचार करावा लागला. तर अशा रोग्याची किडणी खराब होण्याची शक्यता खूपच अधिक असते. अशा रोग्यांनी किडणीची नियमित तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.

किडणी खराब होण्यापासून वाचण्यासाठी, मधुमेहामुळे किडणीवर होणाऱ्या परिणामाचे प्राथमिक निदान गरजेचे आहे. याकरता लघवीत मायक्रो अल्ब्युमिनयुरियाची चाचणी हा एकमेव आणि सर्वात उत्तम तपास आहे.

३. उच्च रक्तदाब असणाऱ्या रोग्यांसाठी घ्यायची आवश्यक काळजी:

उच्च रक्‍तदाब हे क्रॉनिक किडणी फेल्युअरचे महत्त्वपूर्ण कारण आहे. बहुतेक रोग्यांमध्ये उच्च रक्‍तदाबाची कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याने अनेक रोगी रक्‍तदाबाची औषधे अनियमितपणे घेतात किंवा बंद करतात. अशा रोग्यांमध्ये दीर्घकाळ रक्‍तदाब उच्च राहिल्याने किडणी खराब होण्याची भीती असते. यासाठी उच्च रक्‍तदाब असलेल्या रोग्यांनी रक्‍तदाब नियंत्रणात ठेवला पाहिजे आणि किडणीवर त्याच्या होणाऱ्या परिणामांबद्दल त्वरित निदान व्हावे, यासाठी वर्षात किमान एकदा लघवी तसेच रक्तातल्या क्रिअँटिनिनची तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो.

४. क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रोग्यांनी घ्यायची खबरदारी:

क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रोग्यांनी जर खाण्यातील पथ्ये काटेकोरपणे पाळली, नियमित तपासणी केली आणि औषधे घेतली तर किडणी खराब होण्याची प्रक्रिया लाबू शकते आणि डायलिसिस किंवा किडणी प्रत्यारोपणाची गरजही लांबणीवर टाकता येते.

क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रोग्यांनी, किडणीला नुकसान होणे वाचविण्यासाठी उच्च रक्‍तदाबावर नेहमीच योग्य नियंत्रण राखणे हा महत्त्वपूर्ण उपचार आहे. यासाठी रोग्याने घरीच दिवसातून २ ते 3 वेळा रक्‍तदाब तपासून तक्ता बनवावा; जो पाहून डॉक्टर औषधात फेरबदल करू शकतील. रक्‍तदाब १४०/८४ च्या खाली असणे लाभदायक आणि आवश्यक आहे.

क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रोग्यांमध्ये मूत्रमार्गात अडथळा, मुतखडा, लघवीला त्रास अथवा अन्य संसर्ग तसेच शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होणे (डीहायड्रेशन) आदींवर त्वरित उपचार केले तर किडणीची कार्यक्षमता अधिक काळासाठी चांगली राहण्यास मदत मिळू शकते.

५. अनुवंशिक रोग पी.के.डी. चे त्वरित निदान व उपचार:

पॉलिसिस्टिक किडणी डिसीज (पी.के.डी.) हा एक आनुवंशिक रोग आहे. त्यामुळे कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा रोग झाल्याचे आढळून आले तर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुटुंबातल्या अन्य व्यक्‍तींना हा रोग झाला आहे का; या बाबतची चाचणी करणे आवश्यक आहे. हा रोग आई-वडिलांकडून आनुवंशिकतेने पन्नास टक्के मुलांच्यात येतो. त्यामुळे बयाच्या २०व्या वर्षानंतर किडणी रोगाचे कोणतेही लक्षण दिसले नाही तरी लघवी, रक्‍त आणि किडणीची सोनोग्राफी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा दर दोन/तीन वर्षांनी नियमितपणे केली पाहिजे. प्रारंभिक तपासणीनंतर खाण्यापिण्यात पथ्य, रक्तदाबावर नियंत्रण तसेच लघवीतील संसर्ग यावर त्वरित उपचारांच्या मदतीने किडणी खराब होण्याची प्रक्रिया लांबणीवर टाकता येते.

६. मुलांच्या मूत्रमार्गाच्या संसर्गावर योग्य उपचार:

मुलांना वारंवार ताप येत असेल, त्यांचे वजन वाढत नसेल तर यासाठी मूत्रमार्गातील संसर्ग कारणीभूत असू शकतो. मुलांच्यात होणाऱ्या मूत्रमार्गातल्या संसर्गाचे त्वरित निदान आणि त्यावर योग्य उपचार महत्त्वाचे आहेत. जर निदान आणि उपचारात विलंब झाला तर मुलांच्या विकसित होणाऱ्या किडणीची योग्य रीतीने वाढ होत नाही.

अशा प्रकारच्या हानीमुळे भविष्यात किडणी हळूहळू खराब होण्याची भीती असते (मात्र मोठ्या व्यक्तींमध्ये मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे किडणी निकामी होण्याचा धोका कमी असतो). छोट्या वयातील ५०% हून जास्त मुलांत लघवीतील संसर्गाचे मुख्य कारण मूत्रमार्गाला जन्मत: पोहोचलेली हानी किंवा अडथळा असू शकतो.

ह्या प्रकारच्या रोगात योग्य वेळी आणि त्वरित उपचार करणे गरजेचे असते, उपचारांअभावी किडणी खराब होण्याची शक्यता असते.

थोडक्यात, मुलांची किडणी खराब होणे टाळण्याकरिता मूत्रमार्गातील संसर्गाचे त्वरित निदान आणि उपचार आणि संसर्ग होण्याच्या कारणांचे निदान आणि त्यावरील उपचार अत्यंत आवश्यक आहेत.

७. मोठ्या व्यक्तींमध्ये लघवीत वारंवार होणार्‍या संसर्गावरील योग्य उपचार:

कोणत्याही वयात लघवीतील संसर्गाचा त्रास वारंवार होत असेल आणि औषधे घेऊनही तो आटोक्यात येत नसेल, तर याचे कारण जाणून घेणे गरजेचे आहे. जर का याचे कारण मूत्रमार्गातील अडथळा, मुतखडा वगैरे असेल तर योग्य वेळी योग्य उपचारांनी किडण्यांचे संभाव्य नुकसान टाळता येते.

८. मुतखडा आणि बी.पी. एच.वर योग्य उपचार:

बहुतेक वेळा किडणी किंवा मूत्रमार्गात मुतखडा असल्याचे निदान झाल्यानंतरही विशेष त्रास होत नसल्याने रोगी उपचारांबद्दल बेफिकीर बनतो. त्याचप्रमाणे मोठ्या वयात प्रोस्टेटचा त्रास (बी.पी.एच) मुळे निर्माण झालेल्या लक्षणांच्याकडेही रोगी दुर्लक्ष करताना दिसतात. अशा रोग्यांमध्ये दीर्घकाळानंतर किडणीचे नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करणे गरजेचे आहे.

९. कमी वयातील उच्च रक्‍तदाबासाठी तपासणी:

सामान्यत: ३० वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्‍तींना उच्च रक्‍तदाब आढळणे विरळाच. कमी वयात उच्च रक्‍तदाब असण्याचे सर्वात महत्त्वपूर्ण कारण किडणीचे रोग असतात. त्यामुळे कमी वयात उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास किडणीची तपासणी अवश्य केली पाहिजे.

१०. अँक्युट किडणी फेल्युअरच्या कारणांवर त्वरित उपचार:

अचानक किडणी खराब होण्याच्या मुख्य कारणांमध्ये जुलाब, उलटी होणे, मलेरिया, अधिक रक्तस्त्राव, रक्‍तातील संसर्ग, मूत्रमार्गात अडथळे इत्यादींचा समावेश आहे.

या सर्व कारणांवर त्वरित, योग्य आणि पूर्ण उपचार केल्यास किडण्या खराब होणे वाचविता येईल.

११. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचा वापर:

आपण सर्वसाधारणपणे घेत असलेल्या औषधात वेदनाशामक औषधांसारखी अनेक औषधे दीर्घकाळ घेतल्यास किडणीवर परिणाम होण्याची भीती असते. यासाठी अनावश्यक औषधे घेण्याची प्रवृत्ती टाळली पाहिजे आणि आवश्यक औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने, योग्य मात्रेत आणि योग्य वेळी घेणे लाभदायक असते. सर्व आयुर्वेदिक औषधे सुरक्षित असतात हा एक गैरसमज आहे. अनेक जड धातूंचे भस्म किडणीचे मोठे नुकसान करू शकतात.

१२. एक किडणी असलेल्या व्यक्‍तींनी बाळगायची सावधगिरी:

एक किडणी असलेल्या व्यक्‍तींनी अधिक पाणी पिणे, लघवीतील अन्य संसर्गावर त्वरित आणि योग्य उपचार करणे तसेच नियमितपणे डॉक्टरांना तब्बेत दाखवणे अत्यंत आवश्यक आहे.