Read Online in marathi
Table of Content
विवरण
प्राथमिक माहिती
किडणी फेल्योर
किडणी चे इतर मुख्य आजार
मुलांमबिल किडणीची आजार
किडणी आणि आहार

२८. कठीण साब्दाच अर्थ

वैद्यकीय शब्दावली आणि संक्षिप्त शब्दांची माहिती

  • एनीमिया (Anemia): रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, त्यामुळे थकवा येणे, थोडेसे काम केल्यावरही थकवा येणे, श्वास लागणे इत्यादी त्रास दिसून येतात.
  • एरिथ्रोप्रोएटिन (Erythropoietin): एरिथ्रोप्रोएटिन रक्तकण निर्माण होण्यासाठी लागणारा एक आवश्यक घटक आहे. हा घटक किडणीत तयार होतो. किडणी फेल्युअरच्या रुग्णात एरिथ्रोप्रोएटिनचे उत्पादन कमी झाल्यामुळे अस्थिमज्जेतील (Bone Marrow) रक्तकणांची निर्मिती कमी होऊ लागते. त्यामुळे एनीमिया (रक्ताल्पता) होतो.
  • ए. वी. फिस्च्युला (Arterio Venous Fistula): शस्त्रक्रियेद्वारे कृत्रिम रूपात धमनी आणि शीर जोडणे, धमनीतून जास्त दाबाने रक्त आल्यामुळे काही आठवड्यानंतर शीर फुगते आणि त्यातून वाहणाऱ्या रक्ताचे प्रमाण वाढते या फुगलेल्या नसेत विशेष प्रकारची जाड सुई घालून हिमोडायलिसिससाठी रक्त घेतले जाते.
  • ब्लड प्रेशर (Blood Pressure): रक्तदाब.
  • बी.पी.एच. BPH (Benign Prostatic Hypertrophy): प्रौढ वयाच्या पुरुषांच्यात प्रोस्टेटचा आकार वाढल्यामुळे लघवी करायला त्रास होतो.
  • कॅडेव्हर किडणी प्रत्यारोपण (Cadever Kidney Transplantation): 'मेंदू मृत' किंवा 'ब्रेन डेथ' झालेल्या व्यक्तीच्या किडण्या काढून क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेद्वारे बसवल्या जातात.
  • कॅल्शियम (Calcium): शरीरातली हाडे, स्नायू आणि ज्ञानतंतूंच्या आरोग्यासाठी आणि त्यांचे कार्य योग्य व्हावे म्हणून आवश्यक खनिजतत्त्व, दूध आणि दुग्धजन्य पदार्थापासून मिळतात.
  • क्रिएटिनिन आणि युरिया (Creatinine of Urea): क्रिएटिनिन आणि युरिया हे शरीरामध्ये नायट्रोजन मेटाबॉलिझमद्वारे निर्माण होणारे अनावश्यक घटक आहेत, जे किडणीद्वारे बाहेर फेकले जातात. सामान्यपणे रक्तात क्रिएटिनिनचे प्रमाण ०.८ ते १.४ मि.ग्रॅ तर युरियाचे प्रमाण २० ते ४० मिलिग्रॅम टक्के असते. किडणी फेल्युअरमध्ये या प्रमाणात वाढ झालेली दिसते. किडणी फेल्युअरचे निदान आणि उपचारात या दोन्हींची चाचणी महत्त्वपूर्ण असते.

  • सिस्टोस्कोपी (Cystoscopy): विशिष्ट दुर्बिणीतून मूत्राशयाच्या आतील भागाची तपासणी.
  • डायलायझर (Dialyser): हिमोडायलिसिस प्रक्रियेत रक्त शुद्ध करणारी कृत्रिम किडणी.
  • डायलिसिस (Dialysis): जेव्हा किडणीचे काम बंद होते त्यावेळी शरीरातील अनावश्यक पदार्थ व पाणी काढण्यासाठी वापरली जाणारी कृत्रिम पद्धत.
  • डबल ल्युमेन कॅथेटर (DLC): जेव्हा हिमोडायलिसिस करण्याची गरज असते, त्यावेळी शरीरातील रक्त बाहेर काढण्यासाठी वापरात येणारा कॅथेटर. कॅथेटरमध्ये दोन भाग असतात. एका भागातून शरीरातले रक्त शुद्धीकरणासाठी बाहेर काढले जाते, तर दुसऱ्या भागातून शुद्ध केलेले रक्त शरीरात सोडले जाते.
  • इलेक्ट्रोलाईटस् (Electrolytes): सोडियम, पोटॅशियम, क्लोराईडसारखे शरीरात आढळणारे क्षारतत्त्व. ही तत्त्व रक्तातील दाबाचे नियमन आणि स्नायू, ज्ञानतंतू इत्यादींच्या कामात मदत करतात.
  • फिमोरल व्हेन (Femoral Vein): पायात रक्त पोहचवणारी जांघेत असणारी मोठी शिरा. या शिरेत डबल ल्युमेन कॅथेटरचा वापर करून हिमोडालिसिससाठी रक्त काढण्याकरता केला जातो.
  • फिस्च्युला निडल: हिमोडायलिसिससाठी फुगलेल्या शिरेतून रक्त काढण्यासाठी वापरली जाणारी सुई.
  • ग्लोमेरुलोनेफ्रायटीस (Glomerulonephritis): या प्रकारच्या किडणीच्या रोगात प्रामुख्याने सूज, उच्च रक्तदाब, लघवीत रक्तकण आणि प्रथिने आढळतात आणि बरेच वेळा किडणी फेल्युअर दिसून येते.
  • हिमोडायलिसिस (Hemodialysis) रक्ताचे डायलिसिस: मशिनच्या मदतीत कृत्रिम किडणीत रक्त शुद्ध करण्याची कृत्रिम पद्धत.
  • हिमोग्लोबिन (Hemoglobin): हिमोग्लोबिन हा रक्तकणात आढळणारा पदार्थ आहे, जो शरीरात प्राणवायू पोहोचवण्याचे काम करतो. रक्ताच्या तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण समजू शकते. रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणे या आजाराला एनीमिया म्हणतात.

  • हायपरटेन्शन (Hypertension): उच्च रक्तदाब.
  • इम्युनोसप्रेसंट औषध (Immunosuppressant Drugs): किडणी प्रत्यारोपणानंतर घेतली जाणारी सर्वात महत्त्वाची औषधे. ही औषधे शरीरातील प्रतिकारशक्तीवर विशिष्ट प्रकारे काम करतात आणि किडणी नाकारण्याची शक्यता कमी करतात, तसेच रोगाशी लढण्याची शक्ती कायम राखतात. या प्रकारच्या औषधांमध्ये प्रेडनीसोलॉन, सायक्लोस्पोरिन, MMF, एजाथायोप्रिन, टाक्रोरोलिमस इत्यादी औषधांचा समावेश असतो.
  • इन्ट्राव्हिनस पायलोग्राफी (IVP): एक्सरेत आयोडीनचे इंजेक्शन देऊन केली जाणारी तपासणी. ह्या प्रकारच्या पोटाच्या एक्सरे तपासणीत वापरला जाणारा द्रव किडणीतून मूत्रवाहिनी आणि तिथून मूत्राशयात जाताना दिसतो. या तपासणीद्वारे किडणीची कार्यक्षमता आणि मूत्रमार्गाच्या रचनेबद्दल माहिती मिळते.
  • जुग्युलर व्हेन (IJV): इंटर्नल ज्युगुलर व्हेन - डोके आणि गळा यामधील भागात रक्ताभिसरण करणारी मोठी शिरे, जी गळ्यात खांद्याच्या वरील भागात असते. या शिरेत डबल ल्युमेन कॅथेटर घालून हिमोडायलिसिस साठी रक्त काढले जाते.
  • किडणी बायोप्सी (Kidney Biopsy): निदानासाठी सुईद्वारे किडणीतून धाग्यासारखा भाग काढून त्याची मायक्रोस्कोपद्वारे तपासणी.
  • किडणी फेल्युअर (Kidney Failure): दोन्ही किडण्यांची कार्यक्षमता कमी होणे, रक्तातील क्रिएटिनिन आणि युरियाच्या प्रमाणात वाढ होणे हे किडणी फेल्युअरचे मुख्य लक्षण आहे.
  • अक्युट किडणी फेल्युअर (Acute Kidney Failure): सामान्यपणे काम करणाऱ्या दोन्ही किडण्यांचे काम थोड्या काळाकरिता अचानक बंद होणे, या प्रकारात किडणी उपचारानंतर पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्य करू शकते.
  • क्रॉनिक किडणी फेल्युअर (Chronic Kidney Failure): दीर्घकाळ हळूहळू दोन्ही किडण्यांची कार्यक्षमता पुन्हा ठीक न होण्याएवढी बिघडणे.
  • किडणी प्रत्यारोपण (Kidney Transplantation): क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रोग्यात दुसऱ्या व्यक्तीची एक निरोगी किडणी बसवण्याची शस्त्रक्रिया.
  • किडणी रिजेक्शन (Kidney Rejection): किडणी प्रत्यारोपणानंतर शरीरातल्या प्रतिकारशक्तीमुळे नव्या किडणीचे नुकसान होणे.
  • लिथोट्रिप्सी (ESWL): शस्त्रक्रियेशिवाय मुतखड्यावर उपचार करण्याची आधुनिक पद्धत. या पद्धतीत मशिनद्वारे उत्पन्न केल्या गेलेल्या शक्तिशाली आघातांनी खड्याचा चुरा केला जातो आणि तो मूत्राद्वारे बाहेर पडतो.

  • मायक्रोॲल्ब्युमिनिरिया (Microalbuminuria): लघवीतून कमी प्रमाणात जाणाऱ्या ॲल्ब्युमिनचे निदान करण्याची खास पद्धत. मधुमेहामुळे किडणीच्या होणाऱ्या प्रारंभिक नुकसानीचे निदान करण्याची सर्वोत्तम पद्धती.
  • एम.सी.ओ. (Micturating Cystourethrogram): विशेष प्रकारचा आयोडीन द्राव, कॅथटरद्वारे मूत्राशयात घालून लघवीच्या प्रमाणाचा काढला जाणारा एक्सरे.
  • नेफ्रोलॉजिस्ट (Nephrologist): किडणीचे तज्ज्ञ फिजिशियन.
  • नेफ्रॉन (Nephron): किडणीतील फिल्टरसारखे भाग, जे किडणीत आलेल्या रक्ताचे शुद्धीकरण करून लघवी तयार करतात. दर किडणीत १० लाख नेफ्रॉन्स असतात.
  • नेफ्रॉटिक सिन्ड्रोम (Nephrotic Syndrome): हा बहुधा मुलांच्यात आढळणारा किडणीचा आजार आहे, ज्याच्यात मूत्रातून प्रथिने बाहेर गेल्यामुळे शरीरातील प्रथिनांचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे शरीरावर सूज दिसते.
  • पी.यू.जे. ऑबस्ट्रक्शन (P.U.J. Obstruction): जन्मतःच असलेले एक व्यंग, ज्यामुळे किडणी आणि मूत्रवाहिनी जोडणारा भाग आक्रसून जातो आणि त्यामुळे लघवीच्या मार्गात अडथळे निर्माण होऊन किडणी फुगते.
  • पेरीटोनियल डायलिसिस (Peritoneal Dialysis - P.D.): पोटात बरीच छिद्रे असलेला कॅथेटर घालून खास प्रकारच्या द्रावाच्या (P.D. Fluid) मदतीने शरीरातील कचरा दूर करून, रक्त शुद्ध करण्याची प्रक्रिया.
  • फॉस्फरस (Phosphorus): शरीरामध्ये आढळणारे महत्त्वाचे खनिज तत्त्व, की जे हाडे आणि दातांच्या विकास आणि आरोग्यासाठी गरजेचे. हे खनिज दूध, दुधापासून बनवलेले पदार्थ, सुकामेवा, डाळी, अंडी, मांस यातून मिळते.
  • पॉलिसिस्टिक किडणी डिसीज (Polycystic Kidney Disease - PKD): सर्वात जास्त आढळणारा अनुवंशिक रोग. ह्या रोगात किडणीत फुग्यासारख्या अनेक गाठी दिसतात. या गाठींचा आकार वाढत गेल्यामुळे किडणीचा आकारही वाढतो. पी.के.डी.मुळे वाढत्या वयात रक्तदाब वाढतो क्रॉनिक किडणी फेल्युअरही होऊ शकते.

  • पोटॅशियम (Potassium): ह्या खनिज तत्त्वाचे रक्तातले सर्वसामान्य प्रमाण, स्नायूंच्या योग्य कार्यासाठी व हृदयाचे ठोके सामान्य ठेवण्यासाठी आवश्यक आहे. फळे, फळरस, नारळपाणी, सुकामेवा ह्या पदार्थातून पोटॅशियम मोठ्या प्रमाणात मिळते.
  • प्रोटीन (प्रथिन) (Protein): आहाराच्या मुख्य पोषक तत्त्वात प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि चरबी यांचा समावेश असतो. प्रोटीन्स शरीर आणि स्नायू यांची रचना आणि विकासासाठी अत्यावश्यक असतात.
  • रिनल आर्टरी (Renal Artery): किडणीला रक्तपुरवठा करणारी धमनी.
  • अर्धपारगम्य (Semi-Permeable): चाळणीसारखे पातळ आवरण, जे केवळ छोट्या कणांचा निचरा होऊ देते परंतु त्यातून मोठे कण जाऊ शकत नाहीत.
  • सेप्टीसेमिया (Septicemia): रक्तातला गंभीर प्रकारचा जंतुसंसर्ग.
  • सोडियम (Sodium): सोडियम शरीरातील पाणी आणि रक्त यांचा दाब नियंत्रणात राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. हे एक खनिजतत्त्व आहे, जे मिठात आढळते.
  • सोनोग्राफी (Sonography): आवाजाच्या लहरींद्वारे केली जाणारी तपासणी. तपासणीत किडणीचा आकार, रचना, स्थान त्याचप्रमाणे किडणीच्या मार्गात दिसणारे अडथळे, मुतखडा किंवा गाठी आदींबाबत माहिती मिळते.
  • सबक्लेवियन व्हेन (Subclavian Vein): हात आणि छातीच्या वरील भागात रक्त वाहून नेणारी मोठी शीर. ही शीर खांद्याच्या क्लेविकल हाडाच्या मागे असते. या शिरेत डबल ल्युमेन कॅथेटर घालून हिमोडायलिसिस केले जाते.
  • टी. यू आर. पी. (T.U.R.P.): प्रौढ वयात प्रोस्टेटचा आकार वाढल्यामुळे होणाऱ्या त्रासाच्या (BPH) उपचारासाठीची विशिष्ट पद्धती, ज्यात शस्त्रक्रियेशिवाय, दुर्बिणीच्या पद्धतीनं प्रोस्टेट गाठ काढून टाकली जाते.
  • युरोलॉजिस्ट: किडणीचे तज्ज्ञ सर्जन (Urologist).
  • वी. यू. आर. (V.U.R.): मूत्राशय आणि मूत्रवाहिनीच्या मधील झडपेत जन्मतःच व्यंग. या व्यंगामुळे लघवी मूत्राशयातून उलटी मूत्रवाहिनीत जाते. हा रोग पुरुषांमध्ये मूत्रमार्गात संसर्ग, उच्च रक्तदाब आणि क्रॉनिक किडणी फेल्युअर होण्याच मुख्य कारण आहे.