किडणीच्या वेगवेगळ्या रोगांची लक्षणे वेगवेगळी आहेत. यापैकी प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे:
- सकाळी झोपून उठल्यानंतर डोळ्यांच्या वरच्या बाजूला सूज असणे.
- चेहरा आणि पायांवर सूज.
- भूक कमी लागणे, उलटी होणे आणि मळमळ.
- वारंवार; विशेष करून रात्री लघवी होणे.
- कमी वयात उच्च रक्तदाब.
- थकवा जाणवणे रक्तातील पोषक घटक कमी होणे.
- थोडसे पायी चालल्यानंतर दम लागणे, लवकर थकणे.
- सहाव्या वर्षानंतरही बिछाना ओला करणे.
- लघवीचे प्रमाण कमी होणे.
- लघवीच्या वेळी जळजळ आणि त्यातून रक्त आणि पू येणे.
- लघवी करतांना त्रास होणे, थेंब-थेंब लघवी होणे.
- पोटात गाठ येणे, पाय आणि कंबरदुखी.
वरीलपैकी कोणतेही एक लक्षण आढळल्यास किडणीचा रोग झाला असल्याच्या शक्यतेचा विचार करून त्वरित डॉक्टरकडे जाऊन तपास करावा.
सकाळच्या वेळी चेहरा आणि डोळ्यांवर सूज येणे हे किडणी रोगाचे प्राथमिक लक्षण असू शकते.