Read Online in Marathi
Table of Content
विवरण
प्राथमिक माहिती
किडणी फेल्योर
किडणी चे इतर मुख्य आजार
मुलांमबिल किडणीची आजार
किडणी आणि आहार

६. किडणीच्या रोगांसंर्दभात चुकीच्या समजुती आणि सत्य

चुकीची समजूत: किडणीचे सर्व आजार गंभीर असतात.

सत्य: नाही, किडणीचे सर्व आजार गंभीर नसतात. त्वरित निदान आणि उपचारांनी किडणीचे बहुतेक आजार बरे होतात.

गैरसमज: किडणी खराब झाल्यास एकच किडणी निकामी होते.

सत्य: नाही, एक कींवा दोन्ही किडण्या खराब होणे हे रोगाच्या प्रकारावर अवलंबून असते.
सर्वसाधारणपणे जेव्हा रोग्याची एक किडणी पूर्णपणे खराब होते, तेव्हा दुसरी किडणी दोन्ही किडण्यांचे काम करते व रोग्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. रक्‍तात क्रिएटिनिन आणि युरियाच्या प्रमाणात कोणतेही परिवर्तन होत नाही. पण जेव्हा दोन्ही किडण्या खराब होतात तेव्हा किडणीद्वारे शरीरातला साफ केला जाणारा कचरा बाहेर निघू शकत नसल्या कारणाने रक्‍तात क्रिएटिनिन आणि युरिया यांचे प्रमाण वाढते. रक्‍ताची तपासणी केल्यानंतर क्रिएटिनिन आणि युरियाचे वाढलेले प्रमाण किडणी निकामी झाल्याचे दर्शवते.

गैरसमज: किडणीच्या कुठल्याही आजारावर शरीराला सूज येणे, किडणी निकामी झाल्याचे दर्शवतात.

सत्य: नाही, किडणीच्या अनेक रोगांत किडणीचे कार्य सर्वसामान्य असूनही शरीराला सूज येते, जशी नेफ्रॉटिक सिंड्रोममध्ये येते.

गैरसमज: किडणी फेल्युअरमध्ये, सर्व रोग्यांच्या अंगावर सूज दिसते.

सत्य: नाही, काही रोगी जेव्हा दोन्ही किडण्या खराब झाल्यामुळे डायलिसिस करतात तेव्हाही सूज नसते. थोडक्यात किडणी खराब झालेल्या अधिकांश रोग्यांच्यात सूज दिसून येते, पण सगळ्यांच्यात नाही.

गैरसमज: आता माझी किडणी ठीक आहे. मला आता औषध घ्यायची गरज नाही.

सत्य: बराच काळ सुरू असलेल्या किडणी खराब होण्याच्या प्रक्रियेत (CKD) अनेक रोग्यांना उपचारांमुळे लक्षणे कमी झालेली दिसतात. असे काही रोगी निरोगी झाल्याच्या भ्रमात राहून स्वत:हूनच औषधे बंद करतात, जे घातक ठरू शकते. औषधे आणि पथ्याच्या अभावामुळे किडणी लवकर खराब होण्याची आणि थोडयाच काळात रोग्याला डायलिसिसची गरज लागण्याची भीती असते.

गैरसमज: रक्‍तात क्रिअँटिनिनचे प्रमाण थोडे अधिक असले तरी, तब्बेत ठीक आहे; मग चिंता करायचे कारण नाही किंवा उपचारांचीही गरज नाही.

सत्य: हे एकदम चुकीचे विचार आहेत. क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रोग्यांमध्ये क्रिएटिनिनचे वाढलेले प्रमाण तेव्हाच दिसते, जेव्हा दोन्ही किडण्यांची कार्यक्षमता ५०% पेक्षा कमी झालेली असते. जेव्हा रक्‍तातल्या क्रिअँटिनिनचे प्रमाण ९.६ मिलिग्रॅम टक्यांपेक्षा जास्त असते तेव्हा दोन्ही किडण्या ५० टक्यांपेक्षा जास्त खराब झाल्या आहेत असे म्ह्णू शकतो. या अवस्थेत लक्षणे दिसून न आल्याने अनेक रोगी उपचार आणि पथ्य पाळण्यात हलगर्जीपणा करतात. परंतु अशा अवस्थेत उपचार आणि पथ्य पाळल्याने सर्वाधिक फायदा होतो. अशावेळी नेफ्रॉलॉजिस्ट (किडणी रोग तज्ज्ञ) कडून देण्यात येणारी औषधे दीर्घकाळ किडणीची व शरीराची क्षमता सांभाळण्यासाठी मदत करतात.
सर्वसाधारणपणे रक्‍तातले क्रिअँटिनिनचे प्रमाण जेव्हा ५.० मिलिग्रॅम टक्के होते तेव्हा दोन्ही किडण्या ८० टक्के खराब झालेल्या असतात. अशा स्थितीतही योग्य उपचारांमुळे किडणीला योग्य मदत मिळू शकते. परंतु आपल्याला कळले पाहिजे की, अशा अवस्थेत उपचारांमुळे किडणीला होणाऱ्या फायद्याची वेळ आपण गमावली तर नाहीना?
जेव्हा रक्‍तातले क्रिऐंटिनिनचे प्रमाण ८ ते १० मिलीग्रॅम टक्के असते तेव्हा दोन्ही किडण्या खूपच खराब झालेल्या असतात. अशा स्थितीत औषधे, पथ्य आणि उपचारांनी किडणी पुन्हा सुधारण्याची संधी आपण जवळपास गमावलेली असते. बहुतेक रोग्यांना अशा अवस्थेत डायलिसिसची गरज पडते.

गैरसमज: एकदा डायलिसिस केल्यावर वारंवार डायलिसिस करणे आवश्यक असते.

सत्य: नाही. अक्युट किडणी फेल्युअरच्या रोग्यांमध्ये काही वेळा डायलिसिस केल्यानंतर किडणी पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्य करू लागते. गैरसमजांमुळे डायलिसिस करण्यात विलंब केल्यास रोगी मृत्युमुखी पडू शकतो.
मात्र क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या अंतिम टप्प्यात तब्बेत नीट ठेवण्यासाठी नियमित डायलिसिस अपरिहार्य असते.
थोडक्यात किती वेळा डायलिसिस करणे गरजेचे आहे हे, किडणी खराब होण्याच्या प्रकारांवर अवलंबून असते.

गैरसमज: किडणी दान केल्यामुळे तब्बेतीवर विपरीत परिणाम होतो.

सत्य: नाही. एका किडणीवर सामान्य आयुष्य जगण्यात कोणतीही अडचण येत नाही.

गैरसमज: किडणी प्रत्यारोपणासाठी किडणी विकत घेता येते.

सत्य: नाही. कायद्याने किडणी विकणे आणि ती खरेदी करणे हे दोन्हीही अपराध आहेत, ज्यासाठी तुरुंगवासही होऊ शकतो. याशिवाय, विकत घेतलेली किडणी प्रत्यारोपणानंतर सफल न होण्याची शक्यता अधिक असते तसेच, प्रत्यारोपणानंतर औषधांचा खर्चही खूप जास्त असतो.

गैरसमज: किडणी फक्त पुरुषांच्यातच असते, जी दोन्ही पायांच्या मध्ये एका पिशवीत असते.

सत्य: पुरुष आणि स्त्रियांच्यातही किडणीची रचना आणि आकार एकसारखाच असतो. तो पोटाच्या मागे आणि कमरेच्या हाडाच्या वरच्या दोन्हीं बाजूंना असतो.

गैरसमज: माझा रक्‍तदाब सामान्य आहे. त्यामुळे मला आता औषध घेण्याची गरज नाही. मला काही त्रासही नाही, तर मी उगाचच औषध का घेऊ?

सत्य: उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले रोगी रक्‍तदाब आटोक्यात आल्यानंतर औषधे बंद करतात. काही रोग्यांना रक्‍तदाब अधिक असूनही काही त्रास होत नाही. त्यामुळे ते औषधे घेणे बंद करतात हे चुकीचे आहे.
उच्च रक्तदाबामुळे दीर्घकाळानंतर किडणी, हृदय आणि मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशी स्थिती टाळण्यासाठी कुठलाही त्रास होत नसतांनाही योग्य प्रकारे आणि योग्य वेळी नियमितपणे औषधे घेणे आणि पथ्य पाळणे अत्यंत गरजेचे असते.